शनिवार, ३ जानेवारी, २००९

नविन वर्ष सुखाचे समृद्धिचे जावो

माधवी

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २००८

खूप दिवसानी आज पोस्ट करत आहे । अणुउर्जा ही वाटते तितकी घटक नाही असे सांगणारे काही लेख वाचण्यात आले आहेत । त्याविषयी नंतर ।

सर्वाना दीपावली सुखाची आणि समाधानाची जावो ।

माधवी

बुधवार, १ ऑक्टोबर, २००८

जर्मनी मध्ये बसवलले फोटोवोल्टेक सेल

शुक्रवार, २६ सप्टेंबर, २००८

फोटोवोल्टेक सेल

फोटोवोल्टेक सेल म्हणजे सौर उर्जेचे रूपांतर विद्युत् उर्जेत करणारे यन्त्र । वरच्या आकृतित सौर उर्जेचे विद्युत् उर्जेत कसे रूपांतर होते ते दाखवले आहे।
आकृतित एक मॉड्यूल दाखवले आहे । त्या मॉड्यूलवर किंवा फोटोवोल्टेक सेल वर सूर्यप्रकाश पडतो अणि त्याचे रूपांतर विद्युत् उर्जेत होते, म्हणजे या मॉड्यूल ला जर वोल्ट मीटर लावला तर त्यात वोल्टेज दिसेल .ह्या वोल्टेज नि मग बैटरी चार्ज होइल अणि सौर उर्जा विद्युत् उर्जेत रूपांतरित होइल।
रितेश
हे सर्व रितेश ने मला ईमेल ने पाठवले ते मी पोस्ट केले आहे । अधिक माहिती हवी असल्यास रितेश ला ईमेल करावा ।

बुधवार, २४ सप्टेंबर, २००८

सोमवार, २२ सप्टेंबर, २००८


डॉ अनंत फडके यांचा एक लेख सर्वांसाठी
माधवी
भारताचा खरा प्रश्न हा आहे की ,जरी अणुकरार झाला तरी फक्त ९-१० % उर्जा उपलब्ध होइल । बाकी लागणारी उर्जा आणायची कुठून ? माझे तर असे मत आहे की फक्त सौर उर्जेचा विचार न करता अजुनही काही अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा विचार गाम्भिर्याने केला पाहिजे । दुसरे असे की आज जी अणुउर्जा उपलब्ध होणार आहे तिचा फायदा फक्त श्रीमंत लोकांनाच होणार आहे । सर्वाना परवडेल अशी उर्जा निर्माण करता यायला हवी अणि हेच मोठे आव्हान आपल्यापुढे आज आहे । सौर उर्जा हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो म्हणुन मी सौरुर्जेच्या पक्षात आहे
माधवी