सोमवार, २२ सप्टेंबर, २००८

भारताचा खरा प्रश्न हा आहे की ,जरी अणुकरार झाला तरी फक्त ९-१० % उर्जा उपलब्ध होइल । बाकी लागणारी उर्जा आणायची कुठून ? माझे तर असे मत आहे की फक्त सौर उर्जेचा विचार न करता अजुनही काही अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा विचार गाम्भिर्याने केला पाहिजे । दुसरे असे की आज जी अणुउर्जा उपलब्ध होणार आहे तिचा फायदा फक्त श्रीमंत लोकांनाच होणार आहे । सर्वाना परवडेल अशी उर्जा निर्माण करता यायला हवी अणि हेच मोठे आव्हान आपल्यापुढे आज आहे । सौर उर्जा हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो म्हणुन मी सौरुर्जेच्या पक्षात आहे
माधवी

२ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

सोलर पैनल अणि विंड मिल एकत्र करून जास्त चांगला परिणाम साधता येतो .आशा सिस्टम्स मी बसवल्या आहेत । अर्थात त्यांचा खर्चा जास्त येतो अणि त्यांची निगाही राखावी लागते पण जसेजसे या सिस्टम्स लोक वापरायला लागतील तसा खर्च कमी होइल यावर काही मार्गदर्शन हवे असल्यास ते मी देऊ शकेन

बिपिन नाटेकर

Unknown म्हणाले...

बरेच जण सौर उर्जेच्या बाजूने बोलत आहेत । सौर उर्जा चांगलीच आहे पण आजची जी गरज आहे मात्र अणु उर्जाच भागवेल । सौर उर्जा वापरत यायला अजुन २० वर्षे तरी लागतील तोपर्यंत काय करायचे? तेव्हा सध्यातरी अणु उर्जेला पर्याय नाही । अणु उर्जे चांगल्या प्रकारेही वापरता येते । अणु अस्त्र बनवायची की नाही ते ठरवता येते । ते आपल्या हातात आहे । सौर उर्जेच्या तुलनेत अणु उर्जा स्वस्त आहे हे मान्य करा ।

पियूष