भारत स्वतंत्र झाला त्यावेली एकुण सगळे वातावरण अणुउर्जे मुळे भारावलेले होते अणुउर्जा तयार करण्याचे तंत्रज्ञान सहज मिळण्यासांरखे होते डौ होमी भाभा यां सारखे संशोधक अणुउर्जे मुळेच भारताचा विकास होइल अशी आशा मनाशी बाळगुन होते डौ होमी भाभा यांच्या अथक परिश्रमामुळे अणुउर्जा आयोग स्थापन झाला अणुउर्जेवरील संशोधन जोरात सुरु झाले भारत कुणाच्याही मदतीशिवाय अणुउर्जा तयार करू लागला
असे प्रयत्न सौर उर्जेबाबत झाले नाहीत त्या मुळे सौर उर्जा मागे पडली नाही म्हणायला डौ दामोदर कोसंबी सारख्या काही लोकांनी त्यावेली सौर उर्जेच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न केला पण ते एकटे पडले आता असे वाटते की त्यावेली जर त्यांच्याकडे थोड़े लक्ष दिले असते तर सौर उर्जे वरचे संशोधन तेव्हापासूनच सुरु झाले असते
माधवी
शनिवार, २० सप्टेंबर, २००८
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा