रविवार, २१ सप्टेंबर, २००८

या ब्लॉग वर आता चर्चा सुरु झाली आहे । रितेश असे म्हणतो की पावसाला सोडून इतर सर्व दिवसांत सौर उर्जा हाच प्रभावी पर्याय राहील। रितेशचे म्हणणे मलाही पटले आहे । पण सर्वाना एक विनंती आहे आपली मते शक्यतो मराठी मध्येच पाठवा।

मला आज सुचलेला विचार

सौर उर्जा तयार करायला लागणारे सोलर सेल तयार करण्याची स्पर्धा सरकारने घ्यावी म्हणजे तरुण मुले या क्षेत्रा कड़े आकर्षित होतील

माधवी

५ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

माझेही मत असेच आहे

भारतात सौर उर्जाच वापरली गेली पाहिजे पण एक प्रश्न असा आहे की आज तरी ही उर्जा महाग आहे आणि वापरायला त्रासदायक आहे । त्यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे

आपण विचार करायला लागलो हे ही नसे थोडके

हरीश

Unknown म्हणाले...

हा ब्लॉग बघून बरे वाटले । आपण फ्रेंच एम्बेसी वर मोर्चा नेला होता त्याची आठवण झाली । अणु उर्जेवरचे संशोधन शान्तते साठी न होता अस्त्र बनवायला होतो । सौर उर्जेत हा धोका नाही। पण अणूउर्जा जशी वापरात आली तशी सौर उर्जा आलेली नाही हे मान्य करायला हवे

नेहा

Unknown म्हणाले...

अणुउर्जा आपल्याला वाटते तेव्हढी घातक आहे का ? अणु उर्जे आणि अण्वस्त्र यांमुले आपण आपले संरक्षण करू शकलो आहोत हे विसरु नका

वृंदा

Unknown म्हणाले...

अणुउर्जा घातक नाही पण अणु अस्त्रे आहेत । अणु उर्जा बनवायचा अणि अस्त्रे बनवायचा रस्ता फार वेगळा नही । आज हे तंत्रज्ञान जर एखाद्या अतिरेकी गटाच्या हाती लागले तर काय होइल ? याचा नुसता विचार सुद्धा करवत नाही ।

ANURAG म्हणाले...

HI,IT's A VERY ESSENTIAL TOPIC FOR INDIAN BENEFIT ON A DEAL OVER NUCLEAR ENERGY!!!
INDIANS SHOULD ALSO CONCENTRATE TO USE ENERGY AVAILABLE IN NATURE WITHOUT ANY SIDE EFFECTS!!!!!!

YOU HAVE CREATED A VERY KNOWLEDGE BASED BLOG,INORDER TO KNOW US ABT THIS!!!!!!!!!!!
THANKING U!!!
ANURAG!!!!!!!!!
BIRLA COLL